जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला… जम्मू काश्मीरमध्ये सुरु करण्यात आलेली विकासाची आणि शांतीची प्रक्रिया खंडित करण्याचा हा डाव – मंत्री चंद्रकांत पाटील

101

जम्मू- काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला करण्यात आले. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टेंस फ्रंटने’ घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तान स्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा चेहरा आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. यात संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी हे आहेत. या हल्ल्यावरून देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले कि, जम्मू – काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटक मृत पावले. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. जम्मू काश्मीरमध्ये सुरु करण्यात आलेली विकासाची आणि शांतीची प्रक्रिया खंडित करण्याचा हा डाव असल्याचे पाटील म्हणाले. या हल्ल्यात मृत पावलेल्यांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो, तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. या भ्याड हल्ल्याला कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, याची मला खात्री असल्याचे देखील मत पाटील यांनी व्यक्त केले.

जम्मू-कश्मीराल कलम ३७० रद्द केल्यानंतराचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्या असल्याचे म्हटले जात आहे.या हल्ल्यात महाराष्ट्र,कर्नाटक, आजूबाजूचे पर्यटक कश्मीरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले असता हा हल्ला झाला आहे. जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांना त्यांची नावे विचारुन टार्गेट करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.