कोथरुड मतदारसंघातील विविध नागरी समस्यांसंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक संपन्न

28

पुणे : कोथरुड मतदारसंघातील विविध नागरी समस्यांसंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक संपन्न झाली. या समस्यांच्या संदर्भात महापालिकेत घेतलेल्या बैठकांमुळे समाधानकारक परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र असल्याचे पाटील म्हणाले.

मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मिसिंग लिंकसाठीचे जमीन अधिग्रहण, पाणी प्रश्न आदी विषय प्रगतीपथावर असून; त्यावर समाधानकारक प्रगती झाल्याचे दिसून येत आहे, अशी भावना यावेळी पाटील यांनी मांडली. हे सर्व जलदगतीने पूर्ण करावेत, असे निर्देश पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, एम. जे. प्रदीप चंद्रन, मा. नगरसेवक दीपक पोटे, किरण दगडे पाटील, माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे पाठक, भाजपा नेते मंदार बलकवडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.