दहावीचा निकाल जाहीर… कोकण विभागाने पुन्हा मारली बाजी

88

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज लागला. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. त्यापूर्वी . त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काही वेळापूर्वी दहावीच्या निकालाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि विभागीय टक्केवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी असे हे नऊ विभागीय मंडळ आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही दहावीच्या निकालात कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली आहे. तसेच नागपूर विभागीय मंडळाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.

कोकण विभागाचा निकाल – 98.82% इतका लागला आहे. तर कोल्हापूर – 96.87%, मुंबई – 95.84%, पुणे – 94.81%, नाशिक – 93.04%, अमरावती – 92.95%, छत्रपती संभाजीनगर – 92.82%, लातूर – 92.77%, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच– 90.78% इतका लागला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.