धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भव्य ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगर भागातील वैष्णोमाता मंदिर प्रांगणात श्री. विलासभाऊ मडिगेरी यांच्या श्री साई चौक मित्र मंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य ऐतिहासिक प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार शंकर जगताप त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी आमदार सौ. उमाताई खापरे, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, जिल्हा सरचिटणीस तसेच आयोजक विलास मडिगेरी, माऊलीशेठ जगताप, नवीन लायगुडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनात दर्यापती शिवराय जहाज प्रतिकृती, मराठा आरमार, शिवकालीन शस्त्रसज्जता, मराठा नाणेप्रदर्शन अशा ऐतिहासिक गोष्टींचा समावेश आहे. यासोबतच छत्रपतींची महाआरती, प्रयागराज येथील गंगाजल कलश पूजन व गंगा महाआरती यांचेही भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम इतिहासाची जाणीव करून देणारा, प्रेरणादायी ठरतो आहे, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.