तिरंगा यात्रेला पुणेकर देशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांचा देखील यात्रेत सहभाग

पुणे : पुणे शहरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या ऐतिहासिक यशाचा आणि भारतीय सैन्याच्या अद्यम्य शौर्याचा गौरव करण्यासाठी हजारो देशभक्त पुणेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करुन संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौकापर्यंत झालेल्या या यात्रेत देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आपल्या सैन्याने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत देशाचा गौरव वाढवला आहे. ही यात्रा आपल्या वीर सैनिकांप्रती आदर व्यक्त करणारी आणि शहीदांना श्रद्धांजलीचं प्रतीक आहे. आपण दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. त्यातून पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला असून जगालाही संदेश गेला आहे असे मोहोळ यांनी म्हटले.
ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने त्याचा बदला घेतला. त्याचा आम्हाला अभिमान आहे , अशी भावना यावेळी जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांनी व्यक्त केली.
या यात्रेत प्रचंड पावसातही हजारो पुणेकरांसह पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कुटुंबीय गमावलेल्या जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांचाही सहभाग होता. भारत माता की जयsss ! भारतीय सेनेचा विजय असोsss! वंदे मातरम् sss!! अशा जोरदार घोषणासह देशभक्तीपर गाणी आणि शंक नादाने वातावरण दुमदुमून गेलं. फर्ग्युसन रोड संत ज्ञानेश्वर महाराज पादुक चौक येथे या यात्रेचा समारोप झाला.
खासदार मेधाताई कुलकर्णी, राज्यमंत्री आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार हेमंत रासने, आमदार योगेश टिळेकर यांसह शहरातील अनेक गणेश मंडळे, संघटना, पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला.