नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या कलागौरव तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तिमत्वांची निवड – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

23

पुणे :३१ व्या शाहीर मधु कडू ‘नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे मंगळवारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध विनोदी कलाकार नम्रता संभेराव आणि सामाजिक कार्यकर्ते सागर बागडे यांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले.

याप्रसंगी आमदार हेमंत रासने, नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा स्वरदा बापट, कार्याध्यक्ष जतिन पांडे, विश्वस्त ललित जैन तसेच माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मनपा उपायुक्त सुनील बल्लाळ, शाहीर परिदषचे अध्यक्ष दादा पासलकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, विजय कडू, राजेश येनपुरे आदी उपस्थित होते.

नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ३१ व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठानच्या कलागौरव पुरस्काराने लोकप्रिय विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव तर तिसऱ्या स्व. गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने राष्ट्रपती पदक विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांचा सन्मान चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कलेच्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीस नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या कलागौरव तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तिमत्वांची निवड करण्यात आली असलयाचे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.