राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल पुस्तक जत्रेची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता

38

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल पुस्तक जत्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली. या सांगता सोहळ्यानिमित्त “जाणता राजा” महानाट्याच्या प्रयोगाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्यासोबतच पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात हा महोत्सव आयोजित करण्याची सूचना आयोजकांना पाटील यांनी केली.

यावेळी आ. सुनील कांबळे, भाजपा सरचिटणीस तथा कार्यक्रमाचे संयोजक राजेशजी पांडे, संवाद पुणेचे सुनीलजी महाजन, संजय चाकणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेत पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात राहणाऱ्या हजारो मुलांनी आपल्या पालकांसमवेत बाल साहित्याचा अभिनव मेळा अनुभवला.या महोत्सवास मंत्री आशिष शेलार, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावली होती. या उपक्रमाचा शुभारंभ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते .

पुणे बालपुस्तक जत्रेला २५ हजारांहून अधिक मुलांनी भेट दिली. बालपुस्तक जत्रा हा प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला आहे. अशी जत्रा महाराष्ट्रात, देशात कुठेही होत नाही. खेळ, पुस्तके, खाऊ हे सगळे येथे मुलांना एका ठिकाणी उपलब्ध झाले. पुणेकरांनी आणि मुलांनी या जत्रेला भरभरून प्रतिसाद दिला आवडत्या पुस्तकांच्या खरेदीसह गोष्टी, विज्ञानाचे खेळ, जादूचे प्रयोग, पपेट शो, लेखकांशी गप्पा, कथा लेखन कार्यशाळा, जुने पारंपरिक खेळ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर खाऊ गल्लीत चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेतला. बालगोपाळांना साहित्य-संस्कृतीचे महत्त्व हसत खेळत सांगणाऱ्या या पुणे बाल पुस्तक जत्रेचा समारोप रविवारी संपन्न झाला .

 

Get real time updates directly on you device, subscribe now.