राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

23

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील कर्वेनगर भागातील सिद्धेश्वर मंदिरात भाजपा कोथरूड मंडळाच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महादेवांची आरती केली. तसेच आहिल्यादेवींच्या कार्याचा जागर केला. यावेळी भाजपा कोथरूडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त श्री अखिल राजस्थानी समाज पुणे आणि राजस्थानी आघाडी पुणे शहर भाजपच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन,चंद्रकांत पाटील यांनी महाराणाजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, संस्थेच्या नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, संघटनेचे सुनील गहलोत, अखिल राजस्थान समाज अध्यक्ष ओम सिह भाटी, संतोषजी लढा, रामलालजी काग, जयशिह राजपुरोहित, भेंराराम जी.जाट, अजय खेडेकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे मनिष साळुंखे यांच्या सह इतर मान्यवर आणि राजपूत समाज बांधव उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.