“ऑपरेशन सिंदूर -नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखत कार्यक्रमातील संवाद हा ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडणारा आणि भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देणारा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

19

पुणे :पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना हिसका दाखवला. भारताच्या सामर्थ्याचे विराट दर्शन जगाला झाले. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने, युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन सिंदूर -नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड मध्ये करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) (PVSM, UYSM, VSM), ले. जनरल एस. एस. हसबनिस(नि.) (PVSM, VSM, ADC), एअर मार्शल एस. एस. सोमण(नि.) (PVSM AVSM VM) यांच्याशी संवाद साधला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, आजचा हा संवाद ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडणारा आणि भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देणारा होता. या कार्यक्रमात सहभागी होऊन मान्यवरांचे विचार ग्रहण केले. त्यांनी आपल्या भाषणातून नव्या भारतासाठी कार्य करणाऱ्या या वीरांचा गौरव केला आणि तरुणाना प्रेरित करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.

युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर; नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या प्रकट मुलाखत कार्यक्रमाने कोथरूडमध्ये एक उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. या विशेष संवाद सत्रात ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील अत्यंत मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेपासून ते सामाजिक सशक्तीकरणापर्यंत विविध विषयांवर सखोल विचार मांडले.

या कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) (PVSM, UYSM, VSM), लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनिस (नि.) (PVSM, VSM, ADC) आणि एअर मार्शल एस. एस. सोमण (नि.) (PVSM, AVSM, VM) यांनी ऑपरेशन सिंदूर मधील महत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले. भारताच्या संरक्षण शक्तीची व्याप्ती, तयारी, तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरतेचा प्रवास – या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रभावीपणे समोर आल्या.हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक चर्चा नव्हे, तर नव्या भारताच्या आत्मविश्वासाचे, राष्ट्रनिष्ठेचे आणि सामर्थ्याचे प्रकटीकरण होते. भारत सुरक्षित आहे आणि सक्षम हातात आहे हा विश्वास उपस्थित प्रत्येकाच्या मनात दृढ झाला.

कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत, अशा प्रकारचे उपक्रम अधिकाधिक आयोजित व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून नव्या पिढीला राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.