भाजपा नेते, मा. नगरसेवक दत्ता खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

पुणे : भाजपा नेते, मा. नगरसेवक दत्ता खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डेक्कन जिमखाना येथे समर्थ युवा फाऊंडेशन आणि एमएनजीएलच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन दत्ता खाडे यांचे अभिष्टचिंतन केले. या आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी या सेवेचा लाभ घेत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी खाडे यांच्यावतीने चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
दत्ता खाडे हे पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक आहेत. गोपीनाथ मुंडे पासून ते भाजपामध्ये कार्यरत आहेत. आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. आज त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिराचा शुभारंभ भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका नीलिमा खाडे, भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, शिवाजीनगर मंडल अध्यक्ष शैलेश बडदे, अपूर्व खाडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.