चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात पुणे भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनि घेतली पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांची सदिच्छा भेट

पुणे : ३१ मे रोजी राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिका आयुक्त पदावरून मुक्त होताच आज हा पदभार पुण्याचे कोरोनाकाळात जिल्हाधिकारी राहिलेले नवल किशोर राम यांनी स्वीकारला. याच पार्श्वभूमीवर, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत आयुक्त नवल किशोर राम यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांचे पुण्यनगरीत स्वागत करुन आणि त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांच्या नेतृत्वात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त करण्यात आला.
नवलकिशोर राम हे पुणे महापालिकेचे ३८ वे आयुक्त आहेत. या प्रसंगी महापालिकेचे आ. भीमराव तापकीर, हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी., ओमप्रकाश दिवटे, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, राजू शिळीमकर, वर्षाताई तापकीर, दीपक पोटे, गणेश कळमकर, प्रमोद कोंढरे, राहुल भंडारे, रविंद्र साळेगावकर, महेश पुंडे, सुभाषनाना जंगले आदी उपस्थित होते.