उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाणेर-बालेवाडीत भव्य सायक्लोथॉनचे आयोजन

16

पुणे : जागतिक सायकल दिनानिमित्त भाजपा नेते गणेश कळमकर आणि मा. नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या संयोजनात आज बाणेर-बालेवाडीत भव्य सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीमध्ये युवा, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

चंद्रकांत पाटील यांनी या रॅली उपक्रमाला शुभेच्छा देत प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी पुण्याचा संदेश दिला. त्यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी पाटील यांनी सर्व सहभागी सायकलप्रेमींना आणि आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजप नेते गणेश कळमकर, ज्योती कळमकर, भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, निकीता माथाडे, जागृती विचारे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.