वाचन संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे, आणि कोथरुडकरांनी ती समजून घेतली, याचा सार्थ अभिमान – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : वाचनाची आवड वाढविण्यासाठी, समाजमनात विचारशीलतेचे बीज पेरण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या फिरत्या ग्रंथालय उपक्रमाचे आज एक भव्य वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या उपक्रमाचे व्यापक प्रभाव सर्वांसमोर आणण्यासाठी आणि वाचकांशी थेट संवाद साधण्यासाठी आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील हे सपत्नीक उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आज कोथरूडमध्ये एकूण तीन फिरती ग्रंथालये कार्यरत असून, दहा हजारांहून अधिक वाचक नियमितपणे या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. या उपक्रमाचे व्यापक प्रभाव सर्वांसमोर आणण्यासाठी आणि वाचकांशी थेट संवाद साधण्यासाठी आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय कुवळेकर यांचे विचारप्रवर्तक मार्गदर्शन आणि प्रसिद्ध कवी श्री. अशोक नायगावकर यांचे कविता वाचन हे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमात उपस्थित वाचकांच्या भरभरून मिळालेल्या प्रतिक्रियांनी आणि प्रेमाने माझ्या जनसेवेच्या व्रताला नवी ऊर्जा मिळाली. वाचन संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे, आणि कोथरूडने ती समजून घेतली, याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पाटील यांनी विविध उपक्रमांबद्दल माहितीत दिली. ३० मे रोजी ऑपरेशन सिंदूर वर झालेली प्रकट मुलखात हा महत्वपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर आज ८ जून रोजी फिरते वाचनालय यासंबंधित कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर ९ जून रोजी संत पाद्य पूजन कार्यक्रम, आणि वारकऱ्यांना उपयुक्त वस्तू वाटप करण्यात येणार आहे. सुखदा उपक्रम म्हणजेच गरोदर महिलांसाठी डिलिव्हरी पॅकेज आपण सुरु केले. या डिलिव्हरी झालेल्या महिलांचे , त्यांची मुलं आणि परिवारातील सदस्यांचे ११ जून रोजी गेटटुगेदर आयोजित करण्यात येणार आहे. याकार्यक्रमात डिलिव्हरी नंतर घेण्याची काळजी, गर्भसंस्कार, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच पाटील यांनी सुरु केलेला मानसी उपक्रमातील १५ ते २० वयोगटातील मुलींना रोज योगा मोफत, खाणं मोफत, आरोग्य तपासणी मोफत, दर महिन्याला एक सिनेमा मोफतदेण्यात येते. या उपक्रमातील मुली – महिला अशा एकूण ८५० जणी योगा करणार आहेत. २१ जून रोजी योग दिनाला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. यासोबतच त्यांनी महत्वपूर्ण घोषणा केली कि, अशाच प्रकारचा कार्यक्रम हा दर महिन्याला घेतला जाईल ज्यामध्ये नायगावकर, कुवळेकर यांसारखे कलाकार येत राहतील.