मोफत आरोग्य तपासणी शिबिर यासारख्या उपक्रमांमुळे गरजूंना तात्काळ सेवा मिळून शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होते – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

12

पुणे : कोथरूड मतदारसंघातील पाषाण परिसरात कृष्णगंगा सोशल फाउंडेशन आणि भाजपा नेते रोहन कोकाटे यांच्या पुढाकारातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराचे उद्घाटन करून नागरिकांना उत्तम आरोग्य व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन देखील केले. अशा उपक्रमांमुळे गरजूंना तात्काळ सेवा मिळून शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होते, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी भाजप पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, राहूल कोकाटे, सचिन पाषाणकर, निकीता माथाडे, जागृती विचारे यांच्यासह इतर मान्यवर, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.