भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

6

पुणे : भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सौरभ कुंडलिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडला. या कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असून, हे केंद्र नागरिकांसाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त औंध भागातील नागरिकांकारिता “मोफत छत्री वाटप” करण्यात आले. या वेळी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या उद्घाटनप्रसंगी भाजप पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सचिन दळवी, योगेश बाचल तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.