सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

10

गारगोटी : सरस्वती गारमेंटसच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी उपलब्ध होणार असुन शासनस्तरावरून जे सहकार्य लागेल ते आपण देवु असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. खानापूर ता.भुदरगड येथे घेतलेल्या फैशन डिझाईन कोर्सच्या प्रमाण पत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी सौ.अंजली पाटील,सौ.विद्या प्रविणसिंह सावंत प्रमुख उपस्थित होते.यावेळी मंत्री पाटील यांनी गारमेंट च्या विविध कामांचा आढावा घेतला.

पाटील पुढे म्हणाले की,महिला सक्षम झाल्यातरच घराचीही उन्नती होते त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनविणे आपले कर्तव्य आहे. राज्य वाहतूक आघाडी उपाध्यक्ष प्रविण सिंह सावंत म्हणाले की, चंद्रकांत दादानी महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेतला असुन जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न शील आहोत, असे म्हटले

यावेळी पाटील यांचे स्वागत पार्थ सावंत यांनी केले तर, प्रवीणसिंह सावंत ,विद्या सावंत ,वृंदा घाडगे,,पार्थ सावंत ,दत्ता चव्हाण ,दत्ता पाटील ,सुशांत मगदूम ,स्वप्निल मांगले, सुभाष सुतार ,युवा पाटील ,संजय रेडकर ,सागर नाईक ,कृष्णात गोरे, रमेश माने सुरेश पाटील उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.