सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिरता वारकरी दवाखाना’ या उपक्रमाचा आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

7

पुणे : सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीतील वारकरी बांधवांसाठी ‘फिरता वारकरी दवाखाना’ या उपक्रमाचा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम वारकऱ्यांच्या सेवेसाठी निःस्वार्थ भावनेतून चालवला जात आहे, हे खरोखरच स्तुत्य आणि प्रेरणादायी असलयाचे यावेळी पाटील म्हणाले.

दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची ओळख प्रत्येकाला व्हावी, या उद्देशाने सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय उभारले असून आज या संग्रहालयाला पाटील यांनी भेट दिली. हे संग्रहालय भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास असल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती एस. बी. मुजुमदार (सर), प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलगुरू राधाकृष्ण रमण, डॉ. राजीव यरवडेकर, पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, डॉ. राजेंद्र गवई, उल्हास पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.