मराठी पत्रकार संघाच्या वतीने “नेशन फर्स्ट” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन… देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

पुणे : मराठी पत्रकार संघाच्या वतीने “नेशन फर्स्ट” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले. विविधतेतून एकतेचा संदेश देतानाच, देशाच्या सीमांवर लढा देणाऱ्या शूर जवानांचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला. या कार्यक्रमात देशाच्या सीमांचे रक्षण करताना जखमी झालेल्या वीर सैनिकांचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आपले मत व्यक्त करताना गडकरी म्हणाले, आपल्या युद्धभूमीवर ज्यांनी आपल्या देशाकरिता त्याग केला, बलिदान केलं, किंवा युद्धात जखमी झालेल्यांची जाणीव ठेवून हे पत्रकार संघ जे काम करत आहे याबद्दल मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे गडकरी यांनी अभिनंदन केले. आपल्या देशाकरिता, देशाच्या जनतेकरिता आपलं सर्वस्व बलिदान करण्याची तयारी ठेवणारे हे शूर सैनिक हे आपल्या सगळ्याच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित शूर जवानांना गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक मा.श्री एस.बी.मुजुमदार सर, ज्येष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, लोकमान्य मल्टीपर्पजचे किरण ठाकूर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.