मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा “महाराष्ट्र हायर एज्युकेशन थिंक टॅंक” च्या वतीने “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन २०२५” पुरस्कार देऊन गौरव

पुणे : राज्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांचा “महाराष्ट्र हायर एज्युकेशन थिंक टॅंक” च्या वतीने “महाराष्ट्र एज्युकेशन आयकॉन २०२५” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपास्थिती होती. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यावेळी हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नव्या शैक्षणिक धोरणात भारताची वैभवशाली परंपरा नव्या पिढीला शिकवण्याचा आग्रह आहे. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांनी त्या पद्धतीचे उपक्रम राबविले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.