जपानमधील प्रतिष्ठित त्सुकुबा विद्यापीठाच्या प्रतिनिधींची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट, उच्च शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीवर करण्यात आली चर्चा

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मुंबईतील सिंहगड या शासकीय निवासस्थानी जपानमधील प्रतिष्ठित त्सुकुबा विद्यापीठाचे प्रतिनिधी यांची भेट घेतली. महाराष्ट्र शासनासोबत उच्च शिक्षण क्षेत्रात भागिदारी करत गुंतवणुकीची तयारी त्यांनी दर्शवली असून, यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI),(Semiconductor) आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या विकासासाठी IIT मुंबईसोबत संभाव्य भागिदारी या विषयांवर देखील विशेष चर्चा करण्यात आली असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण चर्चेला डॉ. सुकुमार सरदेशमुख, डॉ. योगेंद्र पुराणिक (जपानमधील पहिले भारतीय वंशाचे आमदार) आणि विजयकुमारजी हे मान्यवर उपस्थित होते.