राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या विशेष पुढाकाराने उभारण्यात आलेल्या आनंदनगर पोलीस चौकीचे उदघाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आनंदनगर पोलीस चौकीचे उदघाटन करण्यात आले.
सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या आनंदनगर पोलीस चौकीची उभारणी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या विशेष पुढाकाराने करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी आज या नव्या पोलीस चौकीचे उद्घाटन केले. यावेळी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या उद्घाटन प्रसंगी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.