‘वारकरी भक्ती-योग’ सोहळ्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीचा श्रमपरिहार सोहळा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

16

पुणे : लाखो वारकरी भाविक व नागरिकांच्या सहभागातून जागतिक योग दिनी पार पडलेल्या ऐतिहासिक ‘वारकरी भक्ती-योग’ सोहळ्याच्या पूर्ततेनंतर सर्व सहकाऱ्यांच्या समवेत श्रमपरिहार कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकरी बांधवांसोबत योग दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. भक्तीयोगाच्या या आध्यात्मिक व आरोग्यदायी सोहळ्यासाठी हजारो स्वयंसेवकांनी योगदान दिले. रात्रंदिवस मेहनत घेऊन वारकरी बांधवांची सेवा करणाऱ्या या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. आपल्या सर्वांच्या मेहनतीतून हा भव्य दिव्य आणि नेत्रदीपक सोहळा पार पडला. या सहकार्यासाठी सर्वांचे आभार पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, प्र-कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, भक्तीयोग कार्यक्रमाचे संयोजक राजेशजी पांडे, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा. डॉ. अशोक उबाळे, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. अभिजीत कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. डॉ. सदानंद भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.