केवळ वृक्ष लागवड करून न थांबता, ते जगवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक नागपूरे आणि माजी नगरसेविका सौ. मंजुषाताई नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत १००१ वृक्षांचे रोपण व त्यांचे पालकत्व असा कार्यक्रम,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पर्यावरण संवर्धनासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला “एक पेड माँ के नाम” हा नारा आता एक व्यापक जनचळवळ बनला आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक नागपूरे आणि माजी नगरसेविका मंजुषा नागपूरे यांच्या संयोजनातून १००० वृक्ष रोपणाचा संकल्प करण्यात आला. सिंहगड रोड परिसरातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत,आपल्या आईच्या स्मरणार्थ एका वृक्षाचे रोपण केले. केवळ वृक्ष लागवड करून न थांबता, ते जगवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
प्रसंगी सौ. मंजुषाताई, नागपुरे, दीपक नागपुरे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह अन्य सहकारी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.