मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

पुणे : भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांचे वडील रामचंद्र घाटे यांना काही दिवसांपूर्वीच देवाज्ञा झाली. शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धीरजजींच्या घरी जाऊन बाबांना श्रद्धांजली वाहिली.
चंद्रकांत पाटील यांनी घाटे कुटुंबीयांची भेट घेऊन समस्त घाटे परिवाराचे सांत्वन केले. भाजपा परिवार घाटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे यावेळी पाटील यांनी म्हटले.
धीरज घाटे यांचे वडील रामचंद्र घाटे हे पुणे महानगरपालिकेत नोकरीला होते. शिवजयंती, नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी पुण्यात सामाजिक कामाला सुरुवात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून प्रवास करताना लातूर जिल्ह्यात भारतमाता मंदिर प्रकल्पावर सपत्नीक पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. काव्यसंग्रह करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.