मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत डॉ. दीपक टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट… आम्ही सर्व टिळक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना केली व्यक्त

15

पुणे : “केसरी”चे विश्वस्त तथा लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केसरीवाड्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन दीपकजींना श्रद्धांजली वाहिली.

डॉक्टरांच्या जाण्याने चालते बोलते विद्यापीठ हरपले आहे. त्यांच्या रूपाने एक सुसंस्कृत आणि बहुश्रुत व्यक्तिमत्व हरपले. आम्ही सर्व टिळक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशी भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद देखील त्यांनी भूषवलं आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.