श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी), जुहू येथे २०० मीटर सिंथेटिक ट्रॅक उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

मुंबई : श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी), जुहू येथे २०० मीटर सिंथेटिक ट्रॅक उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘पीएम उषा (मेरू)’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे.
२०३६ मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांत महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, यासाठी प्रत्येक महाविद्यालयीन कॅम्पसमधून किमान ४-५ महिला खेळाडूंची निवड होणे आवश्यक असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
पीएम उषा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेल्या अनुदानामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी करण्यात येणार आहे.
या प्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, कुलसचिव श्री. विलास नांदवडेकर, विद्यापीठातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.