धम्म विनय मठ भविष्यात तथागतांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रभावी केंद्र बनेल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : आगलांबे येथील धम्म विनय मठ येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली . या प्रसंगी महान बोधी वृक्षाचे रोपण करून त्यास अभिवादन केले. तसेच तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले.
या वेळी पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, निवृत्त अधिकारी रत्नाकरजी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धम्म विनय मठ भविष्यात तथागतांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रभावी केंद्र बनेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
“धम्म विनय मठ” म्हणजे बौद्ध धर्मातील एक महत्वाचे संकल्पना आहे. ‘धम्म’ म्हणजे बुद्धांनी दिलेली शिकवण, आणि ‘विनय’ म्हणजे भिक्खू यांच्यासाठी असलेले नियम आणि आचारसंहिता. ‘मठ’ म्हणजे भिक्खूंसाठीचे निवासस्थान किंवा विहार. त्यामुळे, “धम्म विनय मठ” म्हणजे बुद्धांच्या शिकवणीनुसार आणि विनय नियमांनुसार चालणारा मठ किंवा विहार, जिथे भिक्खू राहतात आणि धम्म-विनयाचा अभ्यास करतात.