बहिरम कुऱ्हा येथील आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

अमरावती, बहिरम कुऱ्हा : बहिरम कुऱ्हा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली.
वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार यावेळी पाटील यांचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थानातील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेला वंदन केले.
यावेळी पाटील यांनी आप्पाजी महाराजांच्या कार्याला मन:पूर्वक अभिवादन केले.