संशोधन, नवकल्पना आणि आरोग्याच्या क्षेत्रातील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे योगदान निश्चितच प्रशंसनीय – मंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व परिक्षेत्रातील महाविद्यालयांतील एकूण १० मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देण्याचा मान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना लाभला.
यावेळी विद्यापीठ संशोधित किडनी स्टोनवरील पेटंटप्राप्त औषध कुलगुरूंनी सादर केले. त्याचा औपचारिकरीत्या पाटील यांनी स्वीकार केला. संशोधन, नवकल्पना आणि आरोग्याच्या क्षेत्रातील हे योगदान निश्चितच प्रशंसनीय असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, नॅकचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे आदी उपस्थित होते.