दै. लोकमत परिवारातर्फे आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती… दै. लोकमत मीडिया समूहाच्या सर्व मान्यवरांना पुढील वाटचालीस दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा
नागपूर : यवतमाळ हाऊस, नागपूर येथे दै. लोकमत परिवारातर्फे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय तसेच विधिमंडळातील सदस्यांकरता स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मान्यवरांशी संवाद साधला. तसेच यावेळी दै. लोकमत मीडिया समूहाच्या सर्व मान्यवरांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे माजी मंत्री तथा ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या काळापासून गेली 52 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा लोकमत परिवाराने अविरत सुरू ठेवली आहे.
या प्रसंगी दै. लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, दै. लोकमतचे संपादक व वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते. यावेळी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि विधिमंडळातील सदस्य उपस्थित होते.