भाजपा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, दक्षिण पुणे जिल्हा, उत्तर पुणे जिल्हा अशा विविध विभागाच्या कोअर कमिटीची संघटनात्मक बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

14

पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, दक्षिण पुणे जिल्हा, उत्तर पुणे जिल्हा अशा विविध विभागाच्या कोअर कमिटीची संघटनात्मक बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत संघटनात्मक बांधणी, समन्वय, आणि आगामी राजकीय दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. भाजपाची कार्यसंस्कृती अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरील संघटन अधिक भक्कम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

भारतीय जनता पार्टी संघटनेचा विस्तार, संघटनेचे मजबुतीकरण आणि मोदी सरकार आणि महायुती सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवणे, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनेची तयारी यावरही बैठकीत सविस्तर मंथन झाले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश कार्यालय मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद, दक्षिणचे अध्यक्ष शेखर वडणे, आ. सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, योगेश टिळेकर, शंकरभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, राहुल कुल, उमाताई खापरे, अमित गोरखे, यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.