पिंपरी-चिंचवड सर्व शिंपी समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते समाजातील प्रगतीसाठी निरंतर कार्य करणाऱ्या व्यक्तींना “समाजभूषण पुरस्कार” प्रदान

पुणे : संतशिरोमणी नामदेव महाराज आणि संत श्री जनाबाई यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त, नामदेव समाजोन्नती परिषद आणि पुणे शहर तथा पिंपरी-चिंचवड सर्व शिंपी समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष अभंगवाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांना अभिवादन केले. समाजातील प्रगतीसाठी निरंतर कार्य करणाऱ्या व्यक्तींना “समाजभूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह.भ.प. मुकुंद महाराज नामदास, समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सरचिटणीस डॉ. अजय फुटाणे, राजेंद्र मोरे, रणजीत माळवदे, प्रशांत हरसुले यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.