पुण्यातील वेद पाठशाळेचा ३७ वा वर्धापन दिन कार्तिक पौर्णिमेला साजरा करणार.. कार्यक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे : वेद संस्कृतीचा जागर करणाऱ्या पुण्यातील वेद पाठशाळेचा ३७ वा वर्धापन दिन कार्तिक पौर्णिमेला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दिनांक २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत श्रीमत् जगद्गुरु शंकराचार्य श्री सदानंद सरस्वती (पीठाधीश्वर, पद्मनाभ द्वारका शारदापीठ) यांच्या पावन उपस्थितीत भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने वेद भवन येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी बैठक पार पडली.
या बैठकीत सहभागी होऊन चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच कार्यक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले.
घैसास गुरुजी यांच्यासह वेदभवनाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.