सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात जिल्हा विकास आराखडा आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

14

सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात जिल्हा विकास आराखडा आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन, कौशल्य विकास व समाजकल्याण अशा विविध क्षेत्रांतील विकासाचा सर्वांगीण आराखडा तयार करण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली.

जिल्ह्याची बलस्थाने, कमतरता, संधी व धोके (SWOT Analysis) लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक उपक्षेत्रांची निवड, तसेच बदलांचा सुस्पष्ट आराखडा या बैठकीत मांडण्यात आला. आराखड्यात समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणांनी आपल्या क्षेत्रातील प्रगतीचा मासिक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा, अशा सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.

बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध यंत्रणांचे प्रमुख देखील या बैठकीत सहभागी झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.