विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

46

सांगली : विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘संयम – Self Awareness in Youth for Anti-Addiction Motive (JP Way)’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, सीईओ विशाल नरवाडे, शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था आणि संवेदना सोशल फाउंडेशन यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य या प्रकल्पाला लाभले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील ५ क्लस्टरमधील शाळांमध्ये शिक्षक प्रशिक्षण पूर्ण झाले असून जवळपास ६०० शिक्षक व २५ मुख्य प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला. या प्रकल्पामुळे दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत आत्मसंयमाचे मूल्य पोहोचू लागले आहे.

या उपक्रमावर आधारित माहितीपट तयार करण्यात आला आहे. हा माहितीपट सादर करताना अपार आनंद व समाधान वाटत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. सामाजिक परिवर्तनाच्या या प्रवासात प्रत्येकाची साथ अनमोल असल्याचे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.