पुणे शहर आणि जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी एक अभिनव प्रदर्शन… प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : क्रांतिदिनाचे औचित्य साधून पुण्यातील श्री देवदेवेश्वर संस्थाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांची माहिती पुणेकरांना व्हावी, यासाठी एक अभिनव प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील यांनी प्रदर्शनाचे उदघाटन करून क्रांतिकारकांना अभिवादन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन व पुणे शहर व जिल्ह्यातील ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या स्मृती फलकांचे अनावरण करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील ज्ञात अज्ञात अनेक क्रांतिकारकांची माहिती यनिमित्ताने मिळाली. हे प्रदर्शन हा एक रोमांचक अनुभव ठरला, असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, ॲड. मंदार रेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.