एमआयटीच्या संयोजनातून इलेक्ट्रिक वाहन देखभाल व दुरुस्ती कार्यशाळा… अशा उपक्रमांमुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळून, तंत्रज्ञानाधारित कौशल्य विकासाला बळकटी मिळेल – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यात वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा विचार करता, कोथरुड मतदारसंघातील भाजपचे अजित जगताप व कुणाल तोंडे यांच्या पुढाकारातून आणि एमआयटीच्या संयोजनातून इलेक्ट्रिक वाहन देखभाल व दुरुस्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सहभागी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अशा उपक्रमांमुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळून, तंत्रज्ञानाधारित कौशल्य विकासाला बळकटी मिळेल, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत इलेक्ट्रिक वाहनांच्या मूलभूत गोष्टी आणि बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मूलभूत गोष्टी आणि त्याची गतिशीलता, मोटर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, चार्जिंग इत्यादींचा समावेश आहे. या कार्यक्रमात व्याख्यान सत्रे, डिझाइन गणना आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश होता.
या प्रसंगी भाजपा कोथरूड दक्षिण मंडलचे माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रा. प्रकाश जोशी, डॉ. आर. ओम. चिटणीस, डॉ. मिलिंद पांडे, डॉ. पारुल जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.