कोथरुड मधील भाजपा नेते श्रीधर मोहोळ यांच्या रामबाग कॉलनी येथील जनसंपर्क कार्यालयाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

पुणे : कोथरुड मधील भाजपा नेते श्रीधर मोहोळ यांच्या रामबाग कॉलनी येथील जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीधरजींचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
हे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवणारे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी ,मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर,प्रभाग अध्यक्ष अतुल शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.