उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न

मुंबई : मुंबईतील शासकीय निवासस्थान सिंहगड येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली संदर्भात सादरीकरण करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, या नव्या प्रणालीअंतर्गत, विद्यापीठ आणि संस्थास्तरावर मान्यता प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पाडले जातील. महाविद्यालयांनी आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे आवश्यक असेल. या डिजिटल प्रक्रियेमुळे कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.