मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

33

मुंबई : सांगली जिल्हा बँकेचे संचालक, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, हजारो विद्यार्थी असलेल्या विविध शिक्षण संस्थांचे संस्थापक संचालक, तसेच विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलेले सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकांच्या सह आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ.सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. सत्यजीत देशमुख, आ. प्रवीण दरेकर, माजी आ. संग्राम थोपटे, माजी आ. संजय जगताप, सांगली शहराध्यक्ष प्रकाश ढंग, जन सुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपा मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी पृथ्वीराज पाटील यांनी एक पंचसूत्री आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या प्रक्रियेत पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनांचा समावेश करावा आणि त्यांना या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सांगलीचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांना यावेळी केल्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. पृथ्वीराज पाटील यांनी सादर केलेल्या पंचसूत्री आराखड्याचे वाचन केले असून, त्यांच्या संकल्पना शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील याची मला खात्री आहे. पृथ्वीराज पाटील यांचे भारतीय जनता पार्टीत आणि सांगली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे पाटील यांनी म्हटले.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, वर्षानुवर्षे विकासाचा ध्यास घेऊन निष्ठेने सहकार क्षेत्रासाठी झटणाऱ्या पृथ्वीराज पाटील, यांचा प्रवेश हा भाजपासाठी आनंदाचा क्षण आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपाच्या विकासधोरणावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच सर्वांचा यथोचित सन्मान राखला जाईल.

कुपवाड, मिरज आणि सांगली शहर विधानसभा मतदारसंघात येणा-या 14 गावांतील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी तसेच उपसरपंच, माजी सरपंच यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्यामध्ये आप्पासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब गुरव, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. प्रताप पाटील, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. राजेंद्र मेथे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, प्रकाश व्हनखंडे, माजी नगरसेविका कांचन तुपे, भारती भगत, सांगली दक्षिण चे शहराध्यक्ष बिपीन कदम, कुपवाड शहर अध्यक्ष सनी धोतरे, सांगली शहर जिल्हा सरचिटणीस आनंदराव पाटील, सुनील मोहिते आदींचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.