मिरज येथील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हेल्थ पॅाईंट ब्लड स्टोरेज सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

सांगली : मिरज येथील सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हेल्थ पॅाईंट ब्लड स्टोरेज सेंटरचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या प्रसंगी रुग्णसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आरोग्यदूतांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोविड काळात सिनर्जी रुग्णालयाने केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय ठरले. अनेक रुग्णांना कोविडमधून बरे करण्यात यश मिळाले. आजपर्यंतचा रुग्णालयाचा विकासाचा आलेख विश्वास निर्माण करणारा आहे. रुग्णसेवेचे हे कार्य पुढेही अविरत चालू राहावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, चेअरमन डॉ. रवींद्र आरळी, व्यवस्थापकीय संचालक श्री प्रसाद जगताप तसेच डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.