मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ११०१ दांपत्यांचा सामूहिक रुद्र पूजन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

9

पुणे : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कोथरुडमध्ये भक्तीमय वातावरणात “सामुहिक रुद्र पूजन” सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ११०१ दाम्पत्य, ५०० एकल भाविक तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांनी सामुहिक रुद्र अभिषेक व पूजन केले.

यावेळी नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले “भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा हा सामूहिक प्रयत्न आहे. यातून समाजात भक्तीभाव, सकारात्मकता आणि एकात्मतेची भावना वाढीस लागते.”

त्र्यंबकेश्वरचे संकेत टोके गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेदघोष करत सर्व भाविकांकडून विधीपूर्वक पूजन घडवून आणले. परिसरात घुमणारा ‘ॐ नमः शिवाय’ चा गजर संपूर्ण वातावरण शिवमय करून गेला. श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचे प्रतीक ठरलेले हे सामूहिक रुद्र पूजन हजारो शिवभक्तांसाठी अविस्मरणीय ठरले.

या वेळी परम पूज्य भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, माजी नगरसेविका मोनिकाताई मोहोळ, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, प्रभाग अध्यक्ष कुलदीप सावळेकर, डॉ. संजय उपाध्ये तसेच कार्यक्रम संयोजक गिरीश खत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.