मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळ आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मित्र मंडळातील गणरायाचे घेतले दर्शन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायांचे दर्शन घेतले. चंद्रकांत पाटील यांनी आज आमदार शंकरराव जगताप यांच्या घरी विराजमान गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यासोबतच गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळा आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मित्र मंडळातील गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.
चंद्रकांत पाटील यांनी आमदार शंकरराव जगताप यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. भक्तिभावाने सजलेले वातावरण, देखणी आरास आणि आरत्यांचा गजर यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले असल्याची भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यासोबतच गणेशोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळा आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मित्र मंडळातील गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. मंडळाने सादर केलेला देखावा आणि मंडळाचे सामाजिक उपक्रम यांचे पाटील यांनी मनभरून कौतुक केले. बाप्पाच्या कृपेने समाजातील बंधूभाव सदैव कायम राहो, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.