‘विकसित महाराष्ट्र – 2047’ च्या संदर्भाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यस्तरीय टास्कफोर्सची महत्त्वपूर्ण बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र – 2047’ च्या संदर्भाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यस्तरीय टास्कफोर्सची महत्त्वपूर्ण बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात पार पडली.
या बैठकीत राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणात्मक पावले, दीर्घकालीन उद्दिष्टे व भविष्यातील कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, एच.एस.एन.सी.विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. हेमलता बागला व संबंधित अधिकारी उपस्थित होते.