मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या नानाची वाडी येथे जाऊन श्री गणरायाचे घेतले दर्शन

पुणे : गणेशोत्सव म्हटले की अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरचा गणपती हे नेहमीच खास आकर्षण राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण पाठविण्यात आले. पाटील यांनी सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील नानाची वाडी येथे जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी पाटील यांनी नानांसोबत विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. त्यांचा स्नेह, साधेपणा आणि मार्गदर्शन नेहमीच वेगळी ऊर्जा देणारे असते. विशेष म्हणजे, “दादा, तुझं कोथरूडमधलं काम खूपच सुंदर सुरु आहे” अशी अनपेक्षित शाबासकीची थाप पाटील यांना मिळाली, हा माझ्यासाठी प्रेरणादायी क्षण ठरला. नानांसारख्या व्यस्त आणि यशस्वी व्यक्तीचे माझ्या कामाकडे लक्ष आहे, ही मोठी समाधानाची बाब असल्याचे पाटील यांनी म्हटले.
या शाबासकीबद्दल मी कृतज्ञ आहे आणि नानांचा हा स्नेह व आशीर्वाद सदैव लाभत राहो अशी प्रार्थना पाटील यांनी बाप्पाचरणी केली.