मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गायिका बेला शेंडे, प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव, हर्षदा फरांदे व गिरीश खत्री यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्रींचे घेतले दर्शन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्यावर असताना ख्यातनाम गायिका बेला शेंडे, प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव, हर्षदा फरांदे व गिरीश खत्री यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्रींचे दर्शन घेतले. गणरायाची कृपा सर्वांवर सदैव राहो अशी प्रार्थना पाटील यांनी यावेळी केली.
ख्यातनाम गायिका बेला शेंडे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्रींचे पाटील यांनी मनोज्ञ दर्शन घेतले. गणरायाची कृपा बेला शेंडे यांच्या सुस्वर कंठावर सदैव राहो, अशी प्रार्थना केली आणि शेंडे कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन त्यांनी घेतले. यासोबतच कोथरूडमधील हर्षदा फरांदे व गिरीश खत्री यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे भक्तिभावाने दर्शन घेतले. सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो हीच बाप्पाचरणी त्यांनी प्रार्थना केली.
घराघरात दिसणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींची विविधता, सुंदर सजावट आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव खरोखरच अविस्मरणीय आहेत. कोथरूडकरांनी सजवलेले गणेशमंडप आणि भक्तिभावाने सजलेले वातावरण हा गणेशोत्सव अधिकच मंगलमय बनवत आहे, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.