पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा “सेवा पंधरवडा” हा उपक्रम राबविणार…यानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा पुणे शहराची बैठक संपन्न

पुणे : देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी सेवेतून साजरा करणार आहे. त्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान भाजपाचा “सेवा पंधरवडा” हा उपक्रम असणार आहे. त्याअनुषंगाने आज भाजपा पुणे शहराची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत सेवा पंधरवड्यामध्ये स्वच्छता, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम होणार असून, प्रत्येक कार्यकर्त्याने या पंधरवड्यामध्ये सहभागी व्हावे आणि लोकसेवेचे उपक्रम राबवावेत, अशी सूचना यावेळी पाटील यांनी केली.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्या आणि मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.