नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ उत्साहात संपन्न… पाटील यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही सन्मान

23

पुणे : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे तसेच पुणे महानगरपालिका व आदर पूनावाला यांच्या सहकार्याने आणि स्वच्छ पॅनकार्ड रोड अभियानाच्या समन्वयाने प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी भागात “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची देखील यावेळी उपस्थिती होती. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करुन; त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता देखील व्यक्त करण्यात आली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आज पुणे शहराची लोकसंख्या ८२ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छतेसाठी प्रशासनावर भार न देता स्वावलंबी बनले पाहिजे. बाणेर-बालेवाडी भागाच्या स्वच्छतेसाठी अमोल बालवडकर यांनी पुढाकार घेऊन २० स्वच्छता वॅार्डनची नेमणूक केली, हे अतिशय अभिनंदनीय आहे, अशी भावना यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केली.

या अभियानात विशेष उपक्रम म्हणून मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांचा “स्वच्छतादूत” म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच वाहतूक कोंडीतून सुटका करून नागरिकांना मदत करणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डन टिमचाही सन्मान करण्यात आला.

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी हा परिसर संपूर्ण पुणे शहरामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावरती येईपर्यंत “मिशन निर्मल” हा उपक्रम निरंतरपणे सुरू राहणार असल्याचे मत यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या परिसराला अधिक स्वच्छ व सुंदर बनवावे, असे आवाहनही अमोल बालवडकर यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक तथा अभियान संयोजक अमोल बालवडकर, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर तापकीर, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, माजी नगरसेवक ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रकाशतात्या बालवडकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, सरचिटणीस अस्मिता करंदीकर, वैशाली कमासदार, कल्याणी टोकेकर, निकीता माथाडे, जागृती विचारे, शरद भूते, सुहास भूते, अनिकेत चांदेरे, राजेंद्र पाडाळे, काळुराम गायकवाड, सोहम मुरकुटे, प्रकाश वर्मा, श्रेयस जाधवर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.