पुणे महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी तब्बल ₹842.85 कोटींची प्रशासकीय मान्यता… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

48

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी तब्बल ₹842.85 कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “अमृत 2.0” अभियानातून राज्यातील 44 शहरांसाठी मलनि:स्सारण प्रकल्प राबविण्यात येत असून त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प पुण्यात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचे आभार मानले.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ₹252.86 कोटी, राज्य सरकारकडून ₹210.71 कोटी, पुणे महानगरपालिकेकडून ₹20.49 कोटी तर उर्वरित निधी खासगी भागीदारीतून उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणेकरांना स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

या प्रकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुणेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांचे चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.