नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मिरजेचे ग्रामदैवत आई अंबाबाई आणि सांगली शहरातील गजेंद्र नगर व रतनशीनगर येथे स्थापन झालेल्या देवीच्या मूर्तीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले दर्शन

20

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. यासोबतच पाटील यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मिरजेचे ग्रामदैवत आई अंबाबाई आणि सांगली शहरातील गजेंद्र नगर व रतनशीनगर येथे स्थापन झालेल्या देवीच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी मिरजेचे ग्रामदैवत आई अंबाबाईचे दर्शन घेतले. सर्वांना उत्तम आरोग्यासह सुख, समृद्धी लाभो, अशी आईच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी श्री अंबाबाई नवरात्रोत्सव मंडळ आयोजित संगीत महोत्सवात सहभागी होत सांगितिक मैफिलीचा देखील त्यांनी मनमुराद आनंद घेतला.

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पाटील यांनी सांगली शहरातील गजेंद्र नगर व रतनशीनगर येथे स्थापन झालेल्या देवीच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. तसेच रतनशीनगर व विश्रामबाग नेमिनाथनगर येथे गीतांजली फाउंडेशनच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवात उपस्थित राहून सर्व भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर, प्रकाश ढंग तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.